
करंट अकाऊंट
करंट अकाऊंट हे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, दुकानदार आणि दैनंदिन मोठ्या व्यवहारांची गरज असलेल्या व्यक्ती/संस्थांसाठी सर्वात उपयुक्त खाते आहे. या खात्यामधून अमर्याद व्यवहार, चेक सुविधा आणि जलद आर्थिक व्यवस्थापन करता येते.
करंट अकाऊंटचे फायदे
व्यवसायासाठी अमर्यादित व्यवहार करण्याची सुविधा मिळते.
ओव्हरड्राफ्ट (OD) सारखी निधीची तात्पुरती सुविधा उपलब्ध होते.
मोठे व्यवहार करण्यासाठी चेकबुक आणि डीडी (Demand Draft) मिळते.
ऑनलाईन बँकिंग आणि जलद फंड ट्रान्सफर सुविधा (RTGS/NEFT) उपलब्ध असते.
व्यवसायाची आर्थिक विश्वासार्हता (Credibility) वाढते.
करंट अकाऊंटची वैशिष्ट्ये
- अमर्याद व्यवहारांची सुविधा – व्यवसायासाठी योग्य.
- किमान शिल्लक रक्कम व्यवहार्य – गरजेनुसार ठेव मर्यादा.
- चेक बुक सुविधा – देयक आणि व्यवहार सुलभ.
- पासबुक / स्टेटमेंट उपलब्ध – प्रत्येक व्यवहाराची स्पष्ट नोंद.
- जलद फंड ट्रान्सफर सेवा – NEFT, RTGS.
- ऑनलाइन / मोबाईल बँकिंग – कुठूनही व्यवहार व्यवस्थापन.
- SMS अलर्ट सेवा – प्रत्येक व्यवहाराची तत्काळ माहिती.
करंट अकाऊंट उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
व्यक्तींसाठी:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पत्ता पुरावा
- दोन पासपोर्ट साईझ फोटो
व्यवसाय / दुकान / कंपनीसाठी:
- व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र / दुकान परवाना
- GST प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास)
- पॅन कार्ड (व्यवसाय/संस्था)
- अधिकृत प्रतिनिधीचे KYC दस्तऐवज
- भागीदारी असल्यास पार्टनरशिप डीड
- कंपनी असल्यास MOA / AOA आणि बोर्ड रिझोल्यूशन
