
सॅलरी अकाऊंट
सॅलरी अकाऊंट हे कर्मचारी, कामगार, अधिकारी, वर्कर्स किंवा नियमित पगार मिळणाऱ्या व्यक्तींसाठी विशेषतः डिझाईन केलेले खाते आहे. वेतन थेट खात्यात जमा होणे, दैनंदिन व्यवहाराची सुविधा आणि डिजिटल बँकिंगसोबत आर्थिक व्यवस्थापन सोपे होते.
सॅलरी अकाऊंटचे फायदे
पगार थेट जमा झाल्याने वेळ आणि श्रम वाचतात.
सुरक्षित आणि जलद व्यवहार.
बिल पेमेंट, UPI, मोबाइल/ऑनलाइन व्यवहारांसाठी उपयुक्त.
नियमित बचतीची सवय लागते.
व्याज लाभ
आर्थिक नियोजन सोपे – कर्ज, विमा किंवा इतर सेवांसाठी उपयोग.
सॅलरी अकाऊंटची वैशिष्ट्ये
मासिक पगाराची – थेट खात्यात जमा सुविधा
किमान शिल्लक – रक्कमेची आवश्यकता नसू शकते
ATM/डेबिट – कार्ड सुविधा
पासबुक / स्टेटमेंट – उपलब्ध
ऑनलाइन / मोबाईल बँकिंग – खाते तपशील व पेमेंट्स घरबसल्या
NEFT / RTGS – व्यवहार
SMS अलर्ट – पगार जमा झाल्याची आणि इतर व्यवहारांची तत्काळ सूचना
सॅलरी अकाऊंट उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पत्ता पुरावा
- कर्मचारी ओळखपत्र / जॉइनिंग लेटर / पगार प्रमाणपत्र
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
