
बीबीपीएस सेवा
आमची पतसंस्था आपल्या सदस्यांना BBPS (Bharat Bill Payment System) अंतर्गत जलद, सुरक्षित आणि पारदर्शक बिल पेमेंट सुविधा उपलब्ध करून देते.
BBPS ही RBI आणि NPCI मान्यताप्राप्त राष्ट्रीय बिल पेमेंट प्रणाली असून, भारतातील विविध बिलांचे लाईट बिल, गॅस बिल, पाणी बिल, मोबाईल पोस्टपेड/रिचार्ज, DTH रिचार्ज, ब्रॉडबँड/वाय-फाय बिल, फास्टॅग रिचार्ज, तसेच EMI/लोन हप्ते सुरक्षितपणे भरण्यासाठीची सर्वात विश्वासार्ह आणि सोयीस्कर सेवा आहे.
BBPS सेवांचे फायदे

२४x७ सेवा उपलब्ध

एकाच ठिकाणी सर्व बिल पेमेंट

त्वरित SMS/Receipt

आरटीजीएस
आमच्या पतसंस्थेमार्फत आता आपणास RTGS (Real Time Gross Settlement) द्वारे मोठ्या रकमांचे जलद, सुरक्षित आणि विश्वसनीय व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. RTGS ही RBI मान्यताप्राप्त निधी हस्तांतरण प्रणाली असून, यात निधी रीयल टाइम आणि ग्रोस बेसिस वर ट्रान्सफर केला जातो. म्हणजेच आपल्या रकमेचा व्यवहार कोणत्याही प्रतीक्षेशिवाय लगेच पूर्ण होतो.
फायदे
- मोठ्या रकमांचे त्वरित हस्तांतरण
- RBI मान्यताप्राप्त सुरक्षित प्रणाली
- देशातील कोणत्याही बँकेत तत्काळ पेमेंट
- विश्वासार्ह, जलद आणि अचूक व्यवहार प्रक्रिया
- व्यवहाराची SMS/Receipt द्वारे तत्काळ नोंद
- सुरक्षित आणि सोपी ऑनलाइन फंड ट्रान्सफर सुविधा
- भारतभर कोणत्याही बँक खात्यावर रक्कम पाठविण्याची सुविधा
- 24×7 सेवा – रविवार व सुट्ट्यांमध्येही उपलब्ध
- कमी शुल्कात विश्वासार्ह सेवा
- SMS/Receipt द्वारे व्यवहाराची त्वरित पुष्टी

एनईएफटी
NEFT (National Electronic Funds Transfer) ही RBI द्वारा चालवली जाणारी सुरक्षित आणि विश्वासार्ह ऑनलाइन फंड ट्रान्सफर प्रणाली आहे. या माध्यमातून देशातील कोणत्याही बँक खात्यावर सहज आणि सुरक्षितरित्या पैसे पाठवता येतात. NEFT सेवा 24×7 उपलब्ध असल्यामुळे व्यवहार कधीही करता येतात.

लॉकर सुविधा
अत्याधुनिक आणि सुरक्षित लॉकर सुविधा उपलब्ध असून सोने-नाणे, दागिने, महत्वाची कागदपत्रे, मालमत्ता करारपत्रे, वसीयतपत्र, विमा पॉलिसी, शेअर्स/बॉण्ड दस्तऐवज यांसारख्या मौल्यवान वस्तू २४x७ सुरक्षेसह सुरक्षित ठेवण्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे.
लॉकर कसे मिळवावे?
लॉकर बुकिंग प्रक्रिया अतिशय सोपी आहे:
- आमच्या शाखेत भेट द्या.
- अर्ज भरा व आवश्यक कागदपत्रे जमा करा
- वार्षिक भाडे भरा
- त्वरित लॉकर अलॉटमेंट
